अचलपूर: अनुसूचित जमातींमध्ये बंजारा, धनगर व इतर समाजांचा समावेश रद्द करावा; राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे अचलपूर तहसीलदारांना
अनुसूचित जमातींमध्ये चुकीने समाविष्ट करण्यात आलेल्या बंजारा, धनगर व इतर समाजांचा समावेश तातडीने रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. परिषदेकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संविधानातील कलम ३४२ नुसार १९५० नंतर काही समाजांचा अनुसूचित जमातींमध्ये चुकीने समावेश करण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही “अनुसूचित जमातींमध्ये चुकीने समाविष्ट