भद्रावतीहून चंद्रपूरकडे येत असताना साखरवाही फाटा येथील हासीम यांच्या भंगार दुकानाजवळ झालेल्या भीषण अपघातात १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या बल्कर कॅप्सूल वाहनामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. सदर घटना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.