खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालानंतर भाजप-शिवसेना महायुतीने भरीव यश संपादन केले आहे. भाजपने यावेळी ८ पैकी ४ जागांवर विजय मिळवत शिवसेना महायुतीच्या १४ विजयी उमेदवारांसह नगराध्यक्ष पदासाठी आवश्यक असलेल्या मताधिक्यात मोलाची भर घातली आहे. याबद्दल विजयी उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.