खंडाळा: शिरवळ पोलिसांनी केसुर्डी येथे एकास मारहाण प्रकरणी तीन जणांना केली अटक
दि. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास केसुर्डी येथे डेट व्हायलर कंपनीचे एच. आर. हेड राजू गिरीशकुमार नायडू हे आपल्या कारमधून घरी जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरुन येवून लोखंडी कोयता, रॉड आणि केबलने गाडीवर हल्ला करुन मारहाण केली होती. त्या प्रकरणी प्रतिक विलास गायकवाड रा. अजनुज, ता. खंडाळा, अनिकेत संपत शिंदे रा. खडकी ता. भोर, अनिकेत दयानंद संकपाळ रा. केंजळ, ता. भोर यांना शिंदेवाडी एमआयडीसी येथून अटक केली.