जालना: अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली मनपाची दादागिरी?
Jalna, Jalna | May 16, 2026 शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात असली तरी या कारवाईवरून आता नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. भोकरदन नाका, कांबळे गल्ली तसेच अंबड चौफुली ते इंदेवाडी परिसरात शनिवारी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. आजली शर्मा यांच्या आदेशानुसार दोन स्वतंत्र पथकांमार्फत ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत अनेक दुकानांवरील शेड, पत्रे, पायऱ्या तसेच मांसविक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. मात्र, अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान