हिंगणघाट,राजमाता जिजाऊ साहेब भोसले तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आज अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास आमदार समीर कुणावार यांच्यासह हिंगणघाट नगरपालिकेच्या अध्यक्षा डॉ. नयना उमेश तुळसकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर दिघे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, हिंगणघाट नगर परिषदेचे गटनेते भूषण पिसे, डॉ. उमेश तुळसकर आदी उपस्थित होते.