एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा पारंपरिक वेशभूषेत जिल्हा कचेरीवर धडकला
Beed, Beed | Sep 15, 2025 बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे हजारो नागरिक, महिला-पुरुष मोठ्या संख्येने एकवटले होते. जिल्हा मुख्यालयात आलेल्या या मोर्चामुळे वातावरणात उत्साह आणि निर्धार दिसून आला. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटिअर मराठा समाजाला कुणबी आरक्षणाचा जीआर काढण्यात आला, त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही न्याय मिळावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.