छठ पूजेच्या निमित्ताने आज दि 28 ऑक्टोबर सकाळी 8 वाजता बल्लारपूर-राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या घाटावर श्रद्धाळूनी अर्घ्य अर्पण केल्यानंतर नौकाविहाराचा आनंद घेत असताना अचानक एक लाकडी डोंगा उलटला. या डॉग्यात सुमारे दहा श्रद्धाळू बसलेले होते. अपघाताच्या क्षणी नदीकाठावर उपस्थित असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत सर्वाना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.