दिग्रस: शहरातील मरीआई संस्थान येथून निघालेल्या काकड आरतीची समाप्ती
दिग्रस शहरातील श्री मरीआई संस्थान येथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक महिन्याच्या निमित्ताने आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी काकड आरतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. पालखीची मिरवणूकित भक्तगणांनी आरत्या, टाळ, मृदुंग यांच्या गजरात सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर दुपारी ४ वाजताच्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तीमय वातावरणात संपन्न झालेल्या या काकड आरतीने संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.