संग्रामपूर: सोनाळा टुनकी रस्त्यावर केळीने भरलेला आयशर ट्रक उलटला २ मजूर ठार, ४ जण जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा टुनकी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ केळीने भरलेला आयशर मिनी ट्रक पलटी होऊन २ ठार व ४ जखमी झाल्याची घटना ११ आक्टोबर रोजी रात्री घडली. या अपघातात नीलेश देवीदासराव चव्हाण व बाळूभाऊ गुणवंत रायबोले यांचा मृत्यू झाला असून गुणवंत रामदास चव्हाण, वनदेवराव जगनराव वानखेडे, इद्रीस खान इब्राहीमखान पठाण आणि शाहीद खान पठाण हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध सोनाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.