अकोला जिल्ह्यातील जलालाबाद येथील भूमीफेरफार प्रकरण गंभीर स्वरूप धारण करत असून मागासवर्गीय समाजातील वयोवृद्ध शेतकरी देवमन पुंडलिक ढवळे न्यायासाठी 8 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आरोपानुसार उपविभागीय अधिकारी शरद जावळे आणि तलाठी देशमुख यांनी संगनमत करून गट क्रमांक 53 मधील वर्ग–2 जमीन गैरकायदेशीररित्या रत्नाबाई गावंडे यांच्या नावावर नोंदवली.