तेल्हारा: तेल्हारा पोलीस स्टेशनने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.
Telhara, Akola | Oct 17, 2025 तेल्हारा पोलीस स्टेशनने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. दिवाळीच्या काळात अनेक जण गावी जात असल्याने घरफोडीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घर सोडताना लाईट व सीसीटीव्ही सुरू ठेवावेत, रोख रक्कम व मौल्यवान दागिने घरात न ठेवता बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बाहेरगावी जात असल्यास शेजाऱ्यांना माहिती द्यावी. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास तात्काळ 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.