गोंदिया: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळी दिवाळी आंदोलन, नोंदविला सरकारचा निषेध
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती.. मात्र, सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तसेच शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना सरकारने मात्र ओला दुष्काळ जाहीर केला नाही आणि याच्याच निषेध नोंदविण्याकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गोंदियात काळी दिवाळी आंदोलन करण्यात आला. यावेळी मुक आंदोलन करत शरचंद्र पवार पक्षाच्या पदाधिका-यानी सरकारचा निषेध नोंदविला.