माजलगाव: माजलगाव येथील मौलावीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री योगी आदित्य नाथांना जीवे मारण्याची खुलेआम धमकी दिली
बीड जिल्ह्यात I Love Mohammad च्या रॅली दरम्यान एका मौलवीने भडकाऊ भाषण केलं आहे. इतकेच नाही तर या मौलवीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची उघडपणे धमकी दिली आहे. रॅली दरम्यान भाषण करताना या मौलवीने योगी आदित्यनाथ यांना गाडण्याची भाषा केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रातील बीड येथे आयोजित आय लव मोहम्मद रॅलीदरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.