परभणी: वसमत रोड खानापुर फाटा परिसरात युवकाचा मृतदेह आढळल्या प्रकरणी नवामोंढा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
शहरातील वसमत रोडवरील खानापूर फाटा परिसरात एका टिनशेडमध्ये संतोष तुकाराम काकडे वय ३३ वर्ष, या युवकाचा मृतदेह मंगळवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास आढळून आला होता. याप्रकरणी मयताचा भाऊ तातेराव काकडे यांनी दिलेल्या खबरीवरुन परभणी शहरातील नवामोंढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोउपनि. भिसे करत आहेत.