भोकर: ससतची नापिकी व बॅंकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेतून वृद्ध शेतकऱ्याने शिंगारवाडी शेत शिवारात गळफास घेऊन केली आत्महत्या
Bhokar, Nanded | Nov 2, 2025 नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे शिंगारवाडी शेत शिवारात दि १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी चार ते सातच्या दरम्यान यातील मयत नामे दिगंबर मारोती एदले वय 65 वर्ष व्यवसाय शेती राहणार शिंगारवाडी तालुका भोकर जिल्हा नांदेड यांनी सततच्या नापिकेला व बँकेचे कर्ज कसे फेडावे फेडायचे या चिंतेत गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी खबर देणार पांडुरंग एदले यांनी दिलेल्या खबरीवरून आज रोजी सायंकाळी भोकर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास सुरू आहे.