अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारांसाठी आज मोठी लगबग सुरू झाली आहे प्रभाग क्रमांक एक ते 17 या सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांचे मुलाखती लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संपन्न झाल्या तरुणांचा विशेष उत्साह महिलांचा मोठा सहभाग आणि प्रत्येक प्रभागातून उमेदवारी घेण्यासाठी सुरू असलेली झटपट यावर राजकीय वातावरण तापलेले दिसले 68 जागांसाठी तब्बल दोनशे अधिक अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांमध्ये चुरस आहे