बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात व निष्काळजीपणे बस चालवून दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) रात्री बिरदवडी येथे घडली.याबाबत ४३ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.