तुमसर: आसलपाणी ते मोठागाव रस्त्यावर विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडला
तुमसर तालुक्यातील आसलपाणी मोठागाव परिसरात दि. 24 नोव्हेंबर रोज सोमवारला सकाळी 6 वा.च्या सुमारास तुमसर महसूल विभागाचे तलाठी मिथिलेस आथीलकर हे गौण खनिज संबंधि आळा घालण्यासंदर्भात पेट्रोलिंग वर असताना त्यांना ट्रॅक्टर क्र.MH 36 L 3425 यात विनापरवाना एक ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय तुमसर येथे जप्त करण्यात आला असून ट्रॅक्टर चालक-मालक आरोपी खेमेश रहांगडाले याच्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.