बार्शीटाकळी: राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत कोणाची कोणा बरोबर ठाम युती नाही: प्रकाश आंबेडकर
राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांत कोणाचीच कोणाबरोबर ठाम युती दिसत नाही. काँग्रेस काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत, तर काही ठिकाणी उद्धव सेना किंवा वंचित बरोबर स्पर्धेत दिसते. त्यामुळे एका पक्षाची सलग्न भूमिका न राहता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युती झाल्या आहेत. काही नगरपालिकांपुरतं हे ऍडजेस्टमेंट असून काही ठिकाणी स्वतंत्र लढती दिसतात.