जळगाव मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद महानगरपालिका कार्यालयात घेण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी गुरुवारी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेची माहिती माध्यमांना दिली.