कन्हारपायली येथे भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी गावकरी, खेळाडूंशी संवाद साधला. खेळाडूंचा उत्साह पाहून त्यांना मनोबल दिले आणि उत्तम खेळासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील तरुणाईला खेळाच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळावी, आरोग्य, शिस्त आणि टीम स्पिरिट वाढावे यासाठी अशा स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत.असे याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले म्हणाले.