ठाणे: मुंब्रा बाबाजी पाटील वाडी येथे लागली भीषण आग
Thane, Thane | Oct 20, 2025 आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुंब्रा येथील बाबाजी पाटील वाडी येथे भीषण आग लागली आहे. ही आग बाबाजी पाटील वाडी येथील एका लग्नाच्या हॉल मध्ये लागली आहे. आगीमुळे हॉलमधील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्पोट झाला होता. तसेच आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.