शिरोळ: कुरुंदवाड पालिकेत तब्बल एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर कुरुंदवाड नगरपालिकेला नवीन मुख्याधिकारी मिळाले
कुरुंदवाड पालिकेत तब्बल एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर कुरुंदवाड नगरपालिकेला नवीन मुख्याधिकारी मिळाले आहेत.आष्टा नगरपालिकेत उत्तम कामगिरी बजावलेले मनोजकुमार देसाई यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.यापूर्वी मुख्याधिकारी नसल्याने पालिकेची अनेक प्रशासकीय कामे रखडली होती.आता मुख्याधिकारी देसाई यांच्या रुजू होण्यामुळे ही सर्व कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.