चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली; राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठ चंद्रपूर जिल्ह्यात
राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाने ‘आयोग आपल्या जिल्ह्यात’ उपक्रमांतर्गत आज दि 17 सप्टेंबर ला 12 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील माहिती अधिकार अधिनियमाची 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली काढली आहेत. नागपूर खंडपीठाचे मुख्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेऊन सदर प्रकरणांचा निपटारा केला आहे.