नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये प्रभाग क्रमांक ३ (ड) मधून ए.आय.एम.आय.एम. च्या उमेदवार अलीशा फहीम खान यांनी विजय मिळवला आहे. या विजयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे, कारण अलीशा खान या नागपूर दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान यांच्या पत्नी आहेत.अलीशा खान यांचे पती फहीम खान हे गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत.