अकोला, दि. २८ : अकोला जिल्ह्यात २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. या काळात वा-यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले असून, वीज, वारा आणि पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली उभे राहू नये, असे निर्देश दिले आहेत. नदीकाठावरील गावांना विशेष सतर्कतेची सूचना देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी पिकांचे आणि जनावरांचे स