चांदूर रेल्वे: अतिवृष्टीग्रस्त ४ लाख ९० हजार ९११ शेतकऱ्यांना मिळणार १११७ कोटींचा मदत निधी,भाजपा आमदारांच्या पाठपुराव्याला यशा
राज्यात केवळ अमरावती जिल्ह्याला हा निधी प्राप्त झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन स्वतंत्र शासकीय निर्णय जाहीर झाले आहे. अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी हा निधी वितरित करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी आज ३१ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी २ वाजता दिली आहे..