जालना शहरात अवैध शस्त्र व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत एका विधी संघर्ष बालकाकडून पोस्टाद्वारे मागवलेली तलवार जप्त केली आहे. शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार डीवायएसपी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तात्काळ कारवाई केली. 28 नोव्हेंबर 2025 रोजी डीवायएसपी पथकातील पोलिस कर्मचारी पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की, एक इसम पोस्ट ऑफिसमधून तलवार घेऊन जाणार आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.