जालना: म्हाडा कॉलनीतील पाणीटंचाईवरून नागरिक आक्रमक; आयुक्त अंजली शर्मा यांना घेराव
महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन; “पाणी मिळाल्याश
Jalna, Jalna | May 5, 2026 जालना - जालना शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील म्हाडा कॉलनी परिसरात अनेक दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या आयुक्त Anjali Sharma यांना घेराव घालत महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला होता. “जोपर्यंत नळाला पाणी येत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केला. त्यामुळे काही काळ महापालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनाची माहिती मिळता