जालना: निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालयात रात्रीच्या सुमारास घुसला लाडका भाऊ; व्हिडीओ चित्रिकरण करुन संचिका चोरल्या
Jalna, Jalna | Oct 11, 2025 जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या दालनात लाडक्या भावाने रात्री 10 वाजेच्या सुमारास घुसून चित्रिकरण केले आणि संचिका चोरल्या. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडली आहे. शनिवार दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील व्यक्तीने निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या दालनात घुसून हा प्रकार केला. त्या संचिका नेमकर्या कोणत्या होत्या हे अजून समजू शकलेलं नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.