भिवंडी: भिवंडीत भीषण अग्नितांडव, नऊ तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीने प्रयत्न सुरू
भिवंडी परिसरातील लोणार गावामध्ये अचानक केमिकल गोडाऊन आणि कुरियर गोदामा मध्ये भीषण आग लागल्याची घटना रात्री उशिरा घडली. त्या ठिकाणी केमिकलचा साठा असल्यामुळे अचानक प्रचंड मोठा भडका उडाला आणि आजीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या जिल्ह्यातील अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे नऊ तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील सहा ते सात तास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. या आगीत आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवली