वडवणी: त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ल्याचा वडवणीत निषेध;पत्रकार परिषदेचे वडवणी पोलिसांना निवेदन
Wadwani, Beed | Sep 21, 2025 त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा वडवणी तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी आणि डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.आज रविवार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पत्रकारांनी वडवणी पोलीस ठाण्यात एकत्र येऊन निवेदन दिले. या निवेदनाद्वारे संबंधित घटनेत सहभागी आरोपींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद य