वडवणी: कवडगावच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर फरार पीएसआय गोपाल बदनेला अटक
Wadwani, Beed | Oct 26, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे  ह्या सातारा जिल्ह्यात येत असलेल्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांनी गोपाल बदने नामक पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप आणि प्रशांत बनकर या तरुणावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप करत आत्महत्या केली आहे. या प्रकरणात पीएसआय गोपाल बदने याला सातारा पोलिसांनी शनिवार दि.25  ऑक्टोबर रोजी, रात्री 10 च्या दरम्यान अटक केली आहे. बदनेला ताब्यात घेतल्यानंतर सुमारे एक तास त्याची कसून चौकशी करण्यात आली.