नायगाव-खैरगाव: रानसुगाव शेत शिवारात दिवसाच्या उजेडात प्रत्यक्ष बिबट्याचे झाले दर्शन ; बिबट्याचा व्हीडिओ व्हायरल
अवघ्या दोन दिवसांपूर्वी नायगाव तालुक्यातील रानसुगाव येथील रावसाहेब संभाजी जाधव यांच्या एका जनावरावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केली होती ही घटना ताजी असतानाच काल देखील मारोती दिगंबर यांच्या शेतात दिवसाच्या उजेडात शेतकऱ्याला बिबट्या दिसला असून त्याचा व्हीडिओ देखील आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास व्हायरल होताना दिसत आहे. प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यामध्ये भीती निर्माण झाली असून वन विभागाला बिबट्या पकडण्यात अपयश येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.