नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा! नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) यांनी “नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता” विस्ताराच्या कामात चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आलेल्या बांधकामांचा पंचनामा करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.