लाखांदूर: खोलमारा ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यासह पतीला मारहाण; चार जणांवर दिघोरी पोलिसात गुन्हा दाखल
ग्रामपंचायतीच्या अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या आरो प्लांटच्या निकृष्ट बांधकामाविरोधात संबंधित प्लांटचा अंदाजपत्रक मागणाऱ्या एका महिला सदस्यासह तिच्या पतीला निर्दय मारहाण करण्याची घटना घडली ही घटना तारीख 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास तालुक्यातील खोलमारा गावात घडली या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या पीडित महिले सदस्येच्या तक्रारीवरून चार आरोपींवर दिघोरी पोलिसात 20 ऑक्टोबर दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला