रोहा: रोहा रुग्णालय डायलेसिस सेंटर उदघाटन पत्रिकेतून आ.व खा.नावे वगळली,शि.ता.प्र.मनोजकुमार शिंदे अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
Roha, Raigad | Jul 6, 2025 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रोहा उपजिल्हा रुग्णालय डायलेसिस सेंटर उदघाटन शनिवारी 5 जुलै रोजी करण्यात आले. मात्र या उदघाटन पत्रिकेतून स्थानिक आमदार व खासदारांची नावे वगळली. शिवसेना तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदेनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील व रोहा वैद्यकीय अधीक्षक सचिन गोमसाळे यांना जाब विचारत खडेबोल सुनावले व ही कार्यक्रम पत्रिका बदलायला लावली.