कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार स्नेहल रमेश मानवटकर याला नागपूर जिल्ह्यातून केले हद्दपार
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सावनेर यांनी स्नेहल रमेश मानवटकर व 26 वर्ष याला सहा महिन्याकरिता हद्दपार केले नमूद आरोपीवर अवैध दारू बाबत अनेक गुन्हे दाखल असून त्याचे गुन्हेगारी कृत्या व नियंत्रण ठेवण्याकरिता वेळोवेळी पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली परंतु आरोपी यांनी आपली गुन्हेगारी गतिविधि निरंतर सुरूच ठेवली. सदर आरोपीला सहा महिन्याकरिता नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण येथून हद्दपार केले आहे