देवळी: देवळीत शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष: शिरजगाव धनाडे येथे दगड आणि काठीने हल्ल्यात तिघे जखमी, गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Sep 22, 2025 देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिरजगाव धनाडे गावात जुन्या शेतीच्या रस्त्यावरून सुरू झालेल्या वादातून एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेत दगड आणि लाकडी काठीने केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. असे आज 22सप्टें रोजी रात्री 10वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहेया हल्ल्यात उमेश यांच्यासह नरेश उईके आणि अभिजीत उईके हेदेखील जखमी झाले. गावातील काही लोकांच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला आणि जखमींना तातडीने पोलीस स्टेशनमध्ये आणले.