साकोली: नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या साकोलीतील उपसंचालक कार्यालयासमोर वनमजुरांचेआंदोलन
महाराष्ट्र राज्य वनरक्षक व वनपाल,व वनकर्मचारी संघटना नागपूर यांच्या वतीने वनमजुरांनी साकोली येथील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक कार्यालयासमोर वनपरिक्षेत्र अधिकारी ए. व्हि.लांबट यांच्या विरोधात सोमवार दिनांक 13 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता धरणे आंदोलन केले. मजुरांच्या संघटनेचे केंद्रीय संघटक उचिबगले यांनी यावेळी वनमजुरांच्या समस्या सांगितल्या.