मुळशी: वाकड मधील भुजबळ चौक येथे भरधाव वाहनाच्या धडकेत आयटी अभियंत्यांचा मृत्यू
Mulshi, Pune | Sep 14, 2025 अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार आयटी अभियंता तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. १४) दुपारी दोनच्या सुमारास मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाकड येथील भुजबळ चौकाजवळ ही दुर्घटना घडली.अमेय सुनील साळेगावकर (वय २८, रा. बालेवाडी, मूळ रा. लातूर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला.