चिखली: मनुबाई येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये आमदार महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे निवासस्थानी पक्षप्रवेश
भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांचे विकासात्मक धोरण व राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखली मतदारसंघातील मौजे मनुबाई येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. या सर्व नवप्रवेशितांचे स्वागत करून आमदार महाले यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.