शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या नगराध्यक्षा डॉ. विजया राजेश नंदुरकर (ठाकरे) सध्या चांगल्याच 'ॲक्शन मोड'मध्ये आल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम भरत त्यांनी आज 2 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामांची झाडाझडती घेतली.