धरणगाव: बांभोरी येथे जुन्या वादातून रिक्षा चालकाला चौघांकडून मारहाण; धरणगाव पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील सावली बियर बार वाईन शॉप जवळ एका रिक्षा चालकाला जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी शिवीगाळ करत लाकडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.