नाशिकमध्ये एम.डी. ड्रग्जची विक्री करणारा आणि एन.डी.पी.एस गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शुभम येवले (वय २५) याला गुन्हे शाखा युनिट–२ ने गुप्त माहितीच्या आधारे पाथर्डीशिवार येथील फ्लॅटवर छापा टाकून अटक केली. आरोपीकडून ५.५ ग्रॅम एम.डी. (किंमत ₹२७,५००), रोख ₹१,४९,०५० आणि इतर मुद्देमाल असे मिळून एकूण ₹२,२६,७५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे आणि गुन्हे शाखा युनिट–२ च्या पथकाने केली.