उदगीर: मुसळधार पावसामुळे सोमनाथपूर येथील तांड्याचा पूल खचला
Udgir, Latur | Sep 15, 2025 उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर तांडा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे तांड्याला जाणाऱ्या रस्त्यावरील पुल खचलाय,१४ सप्टेंबर रोजी रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला,पावसाचा जोर वाढल्याने पूल पाण्याखाली गेला,या पुराच्या पाण्यात पुल खचला असून स्थानिक नागरिकांनी याची माहिती प्रशासनाला दिली आहे,घटनेची माहिती मिळताच १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोमनाथपूर सज्जाचे तलाठी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली यावेळी तांड्यातील नागरीक उपस्थित होते.