केज: कोरडेवाडी साठवण तलाव प्रश्न पेटला;केजमध्ये पाच बससेवर दगडफेक
Kaij, Beed | Oct 14, 2025 केज तालुक्यातील कोरडेवाडी साठवण तलावाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरु होते.हे आंदोलन मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता केज तहसील कार्यालयासमोर सुरू झाले.आंदोलनादरम्यान थोडा तणाव निर्माण झाला आणि काही अज्ञात व्यक्तींनी पाच बसेसवर दगडफेक केली. बाळराजे आवारे पाटील यांनी प्रशासनाशी चर्चा करत तलावाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली.मात्र या वेळी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.