उत्तर सोलापूर: शास्त्रीनगर येथे बस कंडक्टरने ठेवलेल्या पेटीतील रक्कम लंपास
एसटी बस कंडक्टरने पेटीत ठेवलेली १३ लाख ५७४ रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री आठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान दोन नंबर बस स्टॅन्ड शास्त्रीनगर येथे घडली.याप्रकरणी सदाशिव दशरथ खोत (वय-४७,व्यवसाय बस कंडक्टर (रा.मु.पो.रुपीनाळ,ता.चिकोडी.जि.बेळगाव,राज्य कर्नाटक) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.