राहाता: काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश पगारे यांना दमदाटी करून भाजप पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात नेसवली साडी.
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते व समाजसेवक प्रकाश उर्फ मामा पगारे वयवर्ष ७५ यांच्यावर भाजपने केलेल्या अमानुष व अपमानास्पद कृत्याच्या काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केलाय.मंगळवारी रुग्णालयात जात असताना पगारे यांना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी फसवून बोलावल व त्यानंतर त्यांना भर रस्त्यात दमदाटी करून साडी परिधान केली. याचबरोबर जातीवाचक वक्तव्य करून त्यांच्या सन्मानावर गंभीर आघात करण्यात आलाय. या घटनेची दखल घेत काँग्रेसने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.